रत्नागिरी शहरालगत नाचणे येथे पादचार्‍याला धडक देणार्‍या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे सुपलवाडी बाईंग स्टॉप येथे पादचार्‍याला धडक देणार्‍या अज्ञात दुचाकी चालक महिलेविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शरद तुकाराम सावंत (७५, रा. नाचणे, शांतीनगर रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. अपघाताची घटना २ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद सावंत हे २ मे २०२४ रोजी नाचणे सुपलवाडी येथील रस्त्याने चालत जात होते. सकाळी १०.३० च्या सुमारास महिला चालवत असलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात शरद सावंत यांना दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दुचाकी चाालक महिलेविरूद्ध भादंवि कलम २७९, ३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button