मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील सावर्डे नजिकचा उड्डाणपूल दुतर्फा वाहतुकीस खुला
मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील सर्वाधिक लांबीचा आणि चिपळूण शहरात उभारल्या जात असलेल्या उड्डाणपुलाचे रखडलेले काम वगळता चिपळूण टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला वहाळ फाटा येथील उड्डाणपूल सोमवारपासून दुतर्फा वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पेढेतील रखडलेल्या एका मार्गिकेचे कामही पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाईल अशा पद्धतीने युद्धपातळीवर सुरू आहे.महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ कि.मी. दरम्यानच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहाद्दूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत सुमारे पावणेदोनहून अदिक कि.मी.चा हा उड्डाणपूल आहे. ४६ पिलरवर उभ्या राहणार्याा या पुलाचा काही भाग ऑक्टोबरमध्ये कोसळल्यानंतर पुल उभारणीचे काम थांबवले आहे. www.konkantoday.com