बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन रत्नागिरीत आलेल्या जोडप्याचे बिंग फुटले.

बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन रत्नागिरीत आलेल्या जोडप्याचे बिंग जिल्हा शासकीय रुणालयात फुटले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातून झिरो नंबरने बिड येथील पोलिस ठाण्यात जोडप्याच्या पालकांविरोधात तसेच ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी १८ वर्षे पूर्ण होऊन ५ दिवस झालेली विवाहित तरुणी झोपेच्या गोळ्या घेतल्याने अस्वस्थ झालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. ही बाब जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्याच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी केली. त्यावेळी तो तरुण २७ वर्षांचा आणि ती तरुणी ५ दिवसांपूर्वीच १८ वर्ष पूर्ण झालेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच ही तरुणी त्या तरुणाच्या नात्यातीलच असून त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नातेवाईकांनी या जोडप्याचे काही महिन्यांपूर्वी बिड येथे लग्न लावून दिले होते. त्यानंतर नोकरीनिमित्त हे विवाहित जोडपे रत्नागिरीत आले होते. परंतु, या दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, बिड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन लपवलेला गुन्हा अखेर या आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या निदर्शनास आला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी बिड येथील पोलिसांशी संपर्क साधून झिरो नंबरने पोक्सो कायद्यांतर्गत तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button