
पाणी पुरविण्यासाठी गेलेल्या पण मातीत रूतून बसलेल्या टँकरसाठी २९ तासांची शर्थ
खेड तालुक्यातील घेरारसाळगड-ओझरवाडी येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करून परतीच्या प्रवासात अचानक पंचायत समितीचा शासकीय टँकर मातीत रूतून अडकला. तब्बल २९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढण्यात यश येताच प्रशासनासह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. टँकर बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नांशी शर्थ केली. फसलेल्या टँकरमुळे सोमवारी तालुक्यातील तहानलेल्या गावावाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. केवळ एकाच खासगी टँकरद्वारे गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.ओझरवाडीतील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चालक यशवंत चव्हाण हे येथील पंचायत समितीचा टँकर घेवून पाणी विभागाचे अधिकारी शंकर घाडगे यांच्यासह तेथे गेले होते. ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे ओझरवाडी येथे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करून माघारी परतत असताना अचानक मातीत रूतून अडकला. चालकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही टँकर मातीतून बाहेर निघत नव्हता. मातीत फसलेला टँकर बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठघ केली. www.konkantoday.com