छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना ,रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली
मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना घडल्याच्या ४० तासांनंतर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली आहे.बुधवारी सकाळी आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप होती. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून आज सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. त्यांची नावे अजून समजलेली नाहीत. यामुळे मृतांचा १८ वर जाण्याची शक्यता आहेwww.konkantoday.com