
कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी-थिवी उन्हाळी स्पेशल ५ जूनपर्यंत धावणार
उन्हाळी सुट्टी हंगामासाठी कोकण मार्गावर २० एप्रिलपासून दर शनिवारी चालवण्यात येणारी एलटीटी-थिवी उन्हाळी स्पेशल ५ जूनपर्यंत धावणार आहे. याशिवाय आठवड्यातून एकदा धावणारी स्पेशल आता १३ मे ते ५ जून या कालावधीत तीन दिवस धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.उन्हाळी सुट्टीसह लग्नसराईसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात डेरेदाखल होत आहेत. याचमुळे कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांना विक्रमी गर्दी उसळत आहे. कोकण मार्गावर धावणार्या नियमित रेल्वेगाड्यांची प्रतिक्षा यादी १०० ते ३०० च्या आसपास गेली आहे. यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळणे अशक्य झाले असून जनरल डब्यातून प्रवास करण्याची नामुष्की ओढवत आहे. उन्हाळी स्पेशल गाड्यांची संख्या अत्यल्प असल्याने गर्दीचे विभाजन देखील अशक्य झाले आहे. www.konkantoday.com