
किडनी शस्त्रक्रियेसाठी तरूणाला उद्योजक किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हात
राजापूर तालुक्यातील ओणी येथील तरुण अनिल मासये याच्या किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी रत्नागिरीतील उद्योजक किरण सामंत यांनी तातडीने ५० हजार रुपयांची मदत केली. अनिल मासये हा किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. किडनीच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास ८ लाख रुपयांपर्यंतचा खर्च डॉक्टरांकडून सांगण्यात आला. अशावेळी किरण सामंत यांनी त्याला मदतीचा हात देवू केला.अनिल याची घरची परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात आलेला ८ लाख रुपयांचा खर्च त्याच्या कुटुंबियांना परवडणारा नव्हता. त्यामुळे अनिल याचा आत्मविश्वास डळमळीत झाला. काय करावे? कसे करावे? सूचत नव्हते. ही बाब रत्नागिरीतील उद्योजक किरण सामंत यांच्या कानावर आली. तातडीने सामंत यांनी अनिल याची भेट घेवून आपण तुझ्या पाठिशी आहोत, असा विश्वास त्याला दिला. तसेच तातडीची मदत म्हणून ५० हजारांची तत्काळ मदत केली. www.konkantoday.com