कशेडी बोगद्याजवळील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला धडक देवून ५ जणांच्या दुखापतीसह वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हुंडाई कारचालक अकिल इस्माईल फणकर (४७, रा. पाली-रायगड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामदास पाटील हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (एम.एच. ४३/बी.ई. ८८८९) घेवून नवी मुंबई येथून चिपळूण येथे जात होते. याचवेळी हुडाई कारमधून (एम.एच. ०६/सी.पी.२७२१) अकिल फणकर हा ५ प्रवाशांना घेवून गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होता. गोव्याहून मुंबईला जाणार्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात हुंडाई कार उलटून कारमधील ५ जण जखमी झाले. त्यानुसार त्याच्यावर येथील पोलीस स्थानकात रविवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला.www.konkantoday.com