अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे मतदार नाराज ; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. “अजित पवार यांच्या महायुती देण्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला होता” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला होता. परंतु अजित पवारांच्या वर्तनाने महायुतीचा अवमान होणार नाही याची त्यांना खात्री पटली. याचा तुम्हाला बारामतीच्या निकालात प्रत्यय येईल आणि खडकवासला येथील भाजप मतदार कोणाला मतदान करतात यावरुन समजेल”त्याचबरोबर, “शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यामुळे त्यांचे पक्ष फुटले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्यामुळे अजित पवारांना व्हिलन करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होते. आता मराठी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे ही फक्त अफवा आहे” असे वक्तव्यं देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button