
आज आय. एम. ए.चे सर्व डाॅक्टर्स देशभरात काळ्या फिती लावून काम करणार
रत्नागिरी : कोविड कालावधीत रुग्णसेवा करताना देशभरात सुमारे ७०० डाॅक्टर मरण पावले. इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए.)चे सर्व डाॅक्टर्स कोरोनाशी लढण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाच देशभरात होणारे हल्ले, शाब्दिक चिखलफेक याचा संयमाने निषेध व्यक्त करून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी १८ रोजी आय. एम. ए.चे सर्व डाॅक्टर्स देशभरात काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे आय. एम. ए.च्या रत्नागिरी शाखेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
आय. एम. ए.चे अध्यक्ष डाॅ. नीलेश नाफडे, सचिव डाॅ. नितीन चव्हाण आणि कोविड समन्वयक डाॅ. निनाद नाफडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे
www.konkantoday.com