
संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी पुलावरुन रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी पुलावरुन रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची ही घटना रविवार 12 मे रोजी सायंकाळी उशिरा घडली आहे.पर्शुराम शिवराम पाताडे (35,रा.वांद्री कुणबीवाडी संगमेश्वर,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर प्रवासी वैभव खर्डे, दिगंबर सनगरे, अविनाश खापरे हे तिघे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास पर्शुराम पाताडे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एके-5848) मधून आपल्या या तिन मित्रांना घेउन तेथील नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. नदीवर आंघोळ करुन परतत असताना सप्तलिंगी पुलावर पर्शुरामचा रिक्षावरील ताबा सूटला आणि रिक्षा उलटून हा अपघात झाला.www.konkantoday.com