
संगमेश्वरातील आरोग्य अधिकारी कार्यालयाचा दरवाजा कधी उघडणार?
संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची नुतन इमारत उभारून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अन्य तालुक्यातील इमारतींमधून कारभारही सुरू झाला आहे. नुतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ही इमारत लवकरात लवकर ताब्यात घेवून कामकाज सुरू कारावे, असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी जानेवारी महिन्यातच संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकार्यांनाा दिले होते. याला ५ महिन्यांचा कालावधी उलटूनही कामकाज सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जुन्या इमारतीत दाटीवाटीने कारभार हाकताना अधिकारी व कर्मचारीवर्गाचा श्वास कोंडत आहे. पावसाळ्यापूर्वी तरी या इमारतीचा दरवाजा उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. www.konkantoday.com