विधानसभा निवडणुकीत भास्करशेठ जाधव यांना पराभूत करण्याचे भाजपचे डावपेच
लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता कोकणात विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात राजापूर विधानसभा मतदार संघाची चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे नेते भास्करशेठ जाधव आमदार असलेल्या गुहागर विधानसभा मतदार संघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत भास्करशेठ जाधव यांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. गुहागर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनाा महायुतीकडून उमेदवारी मिळावी, अशी मोठी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.www.konkantoday.com