राहुल गांधींनी रस्त्यावरच्या सलुनमध्ये पोहोचून केला हेअर कट आणि दाढी; नेटकरी म्हणतात, “सगळ्या जागा तुम्हाला..”
सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असून अशातच आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा पार पडली होती. त्यांची ही सभादेखील खूप चर्चेत होती. या सभेनंतर त्यांचे काही फोटो सध्या खूप चर्चेत आले आहेत, ज्यात ते चक्क एका रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या सलूनमध्ये बसून केस कापून आणि दाढी करून घेताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो खूप चर्चेत आला आहे.राहुल गांधींचा हा व्हायरल फोटो x(पूर्वीचे ट्विटर) वरील @Anshuman Sail Nehru या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये फोटोसोबत एक कॅप्शनदेखील शेअर करण्यात आली आहे. यामध्ये लिहिण्यात आलंय की, ‘राहुल गांधींनी ‘न्यू मुंबा देवी हेअर कटिंग सलून’, रायबरेली येथे नवीन हेअर कट आणि दाढी केली.’ शिवाय त्या खाली ‘उत्तर प्रदेशचे राहुल’, असंदेखील लिहिण्यात आलं आहे.दरम्यान, या व्हायरल फोटोवर आतापर्यंत २४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून दोन हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाइक केले आहे. शिवाय अनेक जण यावर कमेंट्सदेखील करत आहेत. ज्यात अनेक जण त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत, तर काही जण लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी केलेला स्टंट असल्याचं म्हणत आहेत.दरम्यान, यापूर्वी रायबरेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेतदेखील एका तरुणाने राहुल गांधी यांना एक हटके प्रश्न विचारला होता, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. त्या तरुणाने राहुल गांधींना विचारलं होतं की, तुम्ही लग्न कधी करणार? तरुणाचा हा प्रश्न ऐकून सर्वजण मोठ्याने हसू लागले. त्यावेळी राहुल यांनी उत्तर दिलं की, ‘आता लवकरच लग्न करावं लागेल.’ राहुल गांधी यांनी दिलेल्या या उत्तरानंतर कार्यकर्तेदेखील मोठमोठ्याने हसू लागले.www.konkantoday.com