
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महिला मतदारांचा टक्का घसरला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण अधिक असले तरी मतदानात मात्र महिलांचा टक्का पुरूषांपेक्षा कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक आहे. तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदार संघातील मतदानातील महिलांचा टक्का कमी आहे. राजकारणात महिलांचा प्रभाव अद्याप वाढलेला नाही. केवळ आरक्षण आहे, म्हणून महिलांना संधी मिळते, असे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेबाबत हा अनुभव सार्वत्रिक आहे. केवळ राजकीय आघाडीवरच नाही, तर मतदानाबाबतही महिला फारशा उत्सुक नाहीत की काय, असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसत आहे.www.konkantoday.com