
मुंबई गोवा महामार्गावर लोटे परिसरात कंटेनरला कारची मागून धडक, चार जण जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहत परिसरात भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅगनार मोटारीने रस्त्यावर उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात .मोटारीतून प्रवास करणारे चारजण गंभीर जखमी झाले आहेत.मोटार चालक गंभीर जखमी असून, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहेwww.konkantoday.com