महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळात माचाळचा समावेश
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असं एक ठिकाण आहे ते पर्यटकांना आता खुणावतय. या ठिकाणाला कोकणातलं मिनी महाबळेश्वर असेही संबोधले जातं. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके, थंड वातावरण, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. फुटांवर वसलेलं आहे. लांजा तालुक्यातील छोटंस माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार खाली उतरलेले आभाळ, आल्हाददायक स्वच्छ हवा, या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो.www.konkantoday.com