उन्हाळा वाढल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने केली नागरिकांसाठी थंडाव्याची सोय ,भर दुपारी जयस्तंभ परिसरात पाणी
रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्याने घालण्यात आलेल्या नळ पाणी योजनेच्या पाईपलाईन चा पाईप आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नगर परिषदेच्या समोर म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर अचानक फुटला त्यामुळे तेथील रस्ता उकटला यामधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर मोठा असल्याने हे पाणी संपूर्ण जयस्तंभ परिसरात पसरले हे पाणी बससाठी उभ्या असलेल्या बस स्टॉप च्या जवळूनही वाहत गेले हे पाणी पसरल्याने या पाण्यातून वाहने हाकणे ची कसरत वाहन चालकाला करावी लागले मात्र हे पाणी पसरल्यामुळे भर उन्हाळ्यात तापलेल्या रस्त्यावर पाणी पसरल्यामुळे थंडावा निर्माण झाला होता त्यामुळे शीळ धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने रत्नागिरी शहरवासीयांना एक दिवस आड पाणी करण्याची मोहीम घेतली असली तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून गारवा निर्माण करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने पाईपलाईन फोडून ही सोय केली असावी असे नागरिकांच्या बोलले जात आहेwww.konkantoday.com