संजय राऊतांना कोणीही किंमत देत नाही-उद्योगमंत्री उदय सामंत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन आल्याचे त्यांनी म्हटले.यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता यावरून शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उदय सामंत म्हणाले की, माझ्या गाडीमध्ये देखील आता बॅगा आहेत. त्यामध्ये कपडे आहेत. कुणाला आवश्यकता असेल टीका करणाऱ्यांना तर माझ्याकडे देखील आहे. स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप होतात. संजय राऊतांना कोणीही किंमत देत नाही. www.konkantoday.com