
धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि देवरूख मधील सह्याद्री संकल्प सोसायटीच्या संकल्पनेतून प्रथमच धनेशमित्र संमेलनाचे आयोजन
धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि देवरूख मधील सह्याद्री संकल्प सोसायटीच्या संकल्पनेतून प्रथमच धनेशमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. २३) सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस. के. पाटील सभागृहात संमेलन होईल. कोकणातील संकटग्रस्त धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाचा पुढच्या दहा वर्षांचा प्राथमिक आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार आहे.जंगलतोड आणि हवामान बदलामुळे धनेश पक्षी संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट आहे. देवरुखमधील सह्याद्री संकल्प सोसायटी ही नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन (बंगलोर) या संस्थेतील संशोधकांच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्ह्यात धनेश पक्ष्यावर संशोधन आणि जनजागृतीचे काम करत आहे. विशेष करुन धनेश पक्ष्यांचे अधिवास संवर्धित करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. या संस्थेच्या संकल्पनेमधून राज्यातील पहिल्या धनेशमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला सृष्टीज्ञान संस्था, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन, सह्याद्री निसर्ग मित्र – (चिपळूण), एनव्ही इको फार्म (गोवा), महाराष्ट्र वन विभाग आणि गोदरेज कंपनीचे सहकार्य मिळाले आहे.www.konkantoday.com