
शृंगारतळी बाजरपेठेतील गोविंदा मोबाईल मध्ये जबरी चोरी,सुमारे 30 लाखांचे मोबाईल चोरी झाल्याचा अंदाज
*गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजरपेठेतील गोविंदा मोबाईल मध्ये जबरी चोरी झाल्याची घटना घडली असून या मोबाईल दुकानातून सुमारे 30 लाखांचे मोबाईल चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.या घटनेची दखल घेत गुहागर पोलिसांनी तात्काळ रत्नागिरीतून श्वान पथक मागवले हे घटनास्थळी दाखल झाले तसेच रत्नागिरीतून ठसे तज्ज्ञांची टिमही दाखल झाली असून रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागी पोलीस अधिकारी राजमाने हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.. राहुल शेट यांची ही गोविंद मोबाईल शॉपी असून शृंगारतळी बाजारपेठेत असलेल्या या मोबाईल शॉपीवर रात्री एक ते चार च्या दरम्यान तीन अज्ञातांनी चोरी केल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.www.konkantoday.com