
शासकीय अपंग बालकगृह व शाळा मिरज येथे प्रवेश सुरु
रत्नागिरी, दि. 13: सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय म.रा. पुणे जिल्हा परिषद सांगली अंतर्गत शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, मिरज 416410 येथे मोफत प्रवेश सुरु आहे, असे अधिक्षक शासकीय अपंग बालक गृह व शाळा मिरज यांनी कळविले आहे. या ठिकाणी प्रवेशसाठी वय – 6 ते 14 वर्षे ( 1 ली ते 10 वी ) , अस्थिव्यंग प्रवर्ग (हाता/पायाने अपंग असलेली बालके), जिल्हा शल्य चिकीत्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे. या अपंगाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ तळागळातील गरजू अपंग बालकांनी घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफीस शेजारी, मिरज दु.क्र.(0233)2222513, मो.क्र.9552097241 संपर्क साधावा.www.konkantoday.com