
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील मध्यरेल्वे विस्कळीत
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील मध्यरेल्वे विस्कळीत झालीय. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत.अवकाळी पावसामुळे ठाणे, कल्याण, बद्द्लापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालाय.कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकलचा मार्ग बदलण्यात आलाय. या रेल्वे कळवा मुंब्रा मार्गावर वळवण्यात आल्यात. फास्ट लोकल कळवा व मुंब्रा स्थानकावर थांबवणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था मंदावलीय.मुंबई सेंट्रलची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. अवकाळी पाऊस साधरण संध्याकाळी सुरू झाला, याचवेळी नोकरदार वर्ग कामावरून घरी जाण्यासाठी निघत असतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यात आज झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे रेल्वे वाहतूक बंद पडलीय.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेच सीपीआरओ यांनी दिलीय. दरम्यान अनेक रेल्वे या ट्रकवर उभ्या आहेत. अवकाळी पावसाचा फटका एक्स्प्रेसला रेल्वेंना देखील बसलाय. ऐन संध्याकाळी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यानं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालीय.मुंबई- ठाणे रस्ते वाहतूक विस्कळीतमुंबईकडून ठाणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईतील मेट्रोसेवा देखील ठप्प झालीय. मुंबईमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने तिन्ही प्रकारच्या वाहतूक सेवेवर परिणाम झालाय. हवाई वाहतुकीवरदेखील परिणाम झालाय. मुंबईकडे येणारे अनेक प्लाइट्स दुसरीकडे वळवण्यात आली आहेत.भिवंडीतील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. शहापूर, वाडा तसेच भिवंडी तालुक्यात शहर व ग्रामीण भागामध्ये मागील एका तासापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूय. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय.www.konkantoday.com