रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद बसस्टॉप येथे दुचाकीला धडक देणार्या कारचालकाविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद बसस्टॉप येथे दुचाकीला धडक देणार्या अज्ञात कारचालकाविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. २८ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून कारचालकाचा शोध घेण्यात येत आहे. केदार विलास बोरकर (३०, रा. घुडेवठार, रत्नागिरी) व निरज चंद्रशेखर चौगुले (रा. मांडवी, रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदार बोरकर हा २८ एप्रिल २०२४ रोजी दुचाकी (एमएच ०८ एएम ५८६४) चालवत जयस्तंभ ते मारूती मंदिर असा जात होता. यावेळी निरज चौगुले हा दुचाकीवर मागे बसला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास ते जिल्हा परिषद बसस्टॉप येथून जात असताना मागून येणार्या स्विफ्ट गाडीने त्यांना जोराची धडक दिली, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे. तसेच अज्ञात कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com