
मेंगलोर एक्सप्रेस गाडी मधून एका महिलेच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले
कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानक सध्या चोऱ्याचे प्रमाण वाढले असून या स्थानका वर थांबणार्या गाड्या मधून महिलांना लक्ष्य करत त्यांच्या गळयातील सोन्याचे ऐवज चोरून नेण्याच्या घटनां मध्ये वाढ झाली असून मेंगलोर एक्सप्रेस गाडी मधून एका महिलेच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे.फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार . १० मे रोजी दिल्यानंतर येथील पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भा.दं. वि. सं. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.महिला ही ५ मे रोजी सकाळी १०:०५ च्या मेंगलोर एक्सप्रेस नं. १२१३३, डबा नं. एस. ७ मध्ये सिट नं. ६५ या ट्रेनने मुंबई ते कणकवली प्रवास करीत असताना . ६ मे रोजी रात्री २:१५ वाजताच्या सुमाराम खेड रेल्वे स्टेशनच्या अलीकडे दिवाणखवटी स्टेशनला ट्रेन थांबली होती. ट्रेन सुटली असता फिर्यादी महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने अचानक खेचून तोडून चोरून नेत घटनास्थळ हुन पलायन केलेwww.konkantoday.com