
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यानजिक पहिला अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यानजिक शनिवारी रात्री ८.१० च्या सुमारास इन्होव्हा व्हॅन व हुंडाई कार यांच्यात झालेल्या अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. कशेडी बोगद्यतील दुतर्फा वाहतूक सुरू झाल्यापासून पहिला अपघात घडला आहे.रेश्मा इस्माईल फणकर (२८), साजिदा हसरत डांगू (३६), माहिन आसरा डांगू (तिघे, रा. पुणे), हनुमान लक्ष्मण शेट्ये (४५, महाड), समिधा सुहास मोरे (पाली-रायगड) अशी जखमींची नावे आहेत. इन्होवा कार चालक योगेश रामदास पाटील (३३८) हा एम.एच. ४३/बी.ई. ४८४९ क्रमांकाच्या कारने प्रवाशांना घेवून नेरूळ-मुंबई येथून चिपळूण येथे जात होता. याचवेळी अकिल फणकर हा एम.एच. ०६/सी.पी. २७२१ क्रमांकाच्या हुंडाई कारमधून प्रवाशांना घेवून चिपळूण येथून पाली येथे जात होता. www.konkantoday.com