
चिपळूण येथील मूर्तीकारांना तातडीची मदत हवी
कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने येथील गणेशमूर्ती कारखान्यांनाही तडाखा दिला आहे. महापुराचे पाणी शिरल्याने तयार करण्यात आलेल्या हजारो गणेशमूर्तींचे नुकसान झाले. तयार मूर्ती चिखलाने माखल्या आहेत. ते पुन्हा वापरात आणणे शक्य नसल्याने शेकडो मूर्तीकार अडचणीत सापडले आहेत. मोठमोठी मंडळे, संस्था आणि शासनाने मदतीचा हात दिल्याशिवाय त्यांना पुन्हा उभे राहणे कठीण बनले आहे. www.konkantoday.com