पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील संशयित आरोपी आंबेरकरला खाजगी रूग्णालयात ऍन्जिओग्राफीस परवानगी
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या छातीमध्ये जोराच्या कळा येत असल्याने रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात ऍन्जिओग्राफी करण्यास त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. नुकताच आंबेरकर याचा उपचारासाठीचा अल्पमुदतीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. मात्र पोलिसांच्यया निगराणीखाली उपचार घेण्याचा सल्ला न्यायालयाने दिला होता. त्यानुसार आंबेरकर याने ऍन्जिओग्राफीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने आंबेरकर याला पोलिसांच्या निगराणीखाली कोकण कार्डियाक सेंटर अथवा परकार हॉस्पिटल रत्नाागिरी येथे ऍन्जिओग्राफी करण्यास परवानगी दिली आहे. यावेळी शहर पोलिसाांना आंबेरकर याच्या देखरेखीसाठी पोलीस कर्मचारी देण्याचा आदेश केला. पोलिसांचा होणारा खर्च हा पोलिसांच्या नियमानुसार आंबेरकर याला भरावा लागणार आहे. www.konkantoday.com