
नवनिर्माण हायस्कूलचा दहावी, बारावीचा निकाल १०० टक्के
*रत्नागिरी :* केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज (१३ मे) दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला असून, यात नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावी परीक्षेत (एआयएसएससी) सई सचिन सावंत (९३.०२), फराज फिरोज बन्नीकोप (९०.०४) आणि आवेज झाकीर खान (८८.०४) यांनी, तर बारावी परीक्षेत क्रिश सिंग (८८.०८), ईशा गिरीश जोशी (८४.०२) आणि स्मित सुजीत नाईक (८१.०२) यांनी शाळेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. नवनिर्माण हाय शाळेने सलग ८ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा याहीवर्षी कायम ठेवली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज (१३ मे) दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.९८ टक्के इतके आहे. २०२३ च्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.६० टक्के असून, बारावी बोर्ड परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवनिर्माण हायमध्ये दहावीचे ३५ विद्यार्थी, तर बारावीचे ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.