- देवरूख – डिंगणी चाळके वाडीच्या माळरानावर लागलेल्या वणव्यामध्ये गावातील ११ शेतकऱ्यांची शेकडो काजू कलम झाडे जळून भस्मसात झाल्याने मोठ नुकसान झाले आहे. हा वणवा लागल्याचे समजताच डिंगणीचे तलाठी सुधीर सोनावणे आणि कृषी अधिकारी भानुदास दौण्ड यांनी तात्काळ पाहणी करून पंचनामा केला. खाडी परिसरातील माळरानावर वारंवार वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे जळून खाक होत आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाई मिळात नसलेने शेतकरीही संताप व्यक्त करत आहेत. या वेळेस तरी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती ते करत आहेत. या आणि अशा सततच्या लागणा-या वणव्यांमुळे जैवविविधतेची अपरिमीत हानी होत असून यामुळे ग्लोबल वाॅर्मिंग मध्ये वाढ होत आहे
Back to top button