
मुंबई पुण्यातील चाकरमान्यांना आणण्याबाबत निर्णय झाला की कार्यवाही करण्यात येईल -नामदार उदय सामंत
मुंबई पुण्यासारख्या रेड झोनमधून चाकरमान्यांना आणण्याबाबत अजून शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही महाराष्ट्र शासनाकडून तसा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक प्रशासन याबाबत सर्व परिस्थिती पाहून निर्णय घेईल दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस जिल्हाप्रमुख शासनाचा निर्णय झाल्यानंतर याबाबत योग्य ती कार्यवाही करतील सध्यातरी शासनाकडे यासंबंधी निर्णय झालेला नाही चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत आपल्याकडे जिल्ह्यातील कोणीही आमदारांनी पत्र दिलेले नाही मात्र त्यानी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिल्याची शक्यता आहे असेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com




