आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी सुरू केले नवीन फीचर; ‘हे’ काम होणार एका क्लिकवर!

आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे. हे फीचर करदात्यांना आयकर विभागाने जारी केलेल्या नोटिसा, पत्रे आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल. यावर क्लिक करून, करदात्याला सर्व प्रलंबित कर नोटिसा एकाच ठिकाणी ट्रॅक करणे सोपे होईल. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे करदात्यांची मोठी सोय होणार आहे. यामुळे तुम्हाला आयकर कार्यालयात जाण्याची गरज नाही.*अशी आहे प्रक्रिया*करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल. आता डॅशबोर्डवरून तुम्ही ‘पेंडिंग ॲक्शन्स’ विभागात जाऊ शकता आणि येथून ‘ई-प्रोसिडिंग्स’ वर जाऊ शकता. या फीचरमुळे करदात्यांचा वेळ वाचणार असून नोटीसला उत्तर देणेही सोपे होणार आहे.*’Pending Actions’ मध्ये मिळेल ही माहिती*कलम 245 अंतर्गत अधिसूचनाकलम 139 (9) अंतर्गत सदोष सूचनाकलम 154ची सुओ मोटो सुधारणाइतर कोणत्याही आयकर प्राधिकरणाने जारी केलेली सूचना*कोणती कागदपत्रे लागतील?*हे नवीन फीचर वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना ई-फायलिंग पोर्टलसाठी पॅन, आयडी आणि पासवर्ड आवश्यक असेल. काही प्रकरणांमध्ये, सक्रिय TAN देखील आवश्यक असू शकते.या नव्या फीचरमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे त्यांचा वेळ तर वाचेलच पण त्यांना कर संबंधित माहितीचा मागोवा घेणे आणि उत्तर देणे सोपे होईल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button