५ वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार, महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांची घोषणा
ऐन निवडणूक काळात शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ५ वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचे क्षेत्र असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.अमोल कोल्हे म्हणाले, मतदार संाातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. अभिनय क्षेत्राला ब्रेक घेतला, तरी आता शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही.www.konkantoday.com