
सुसज्ज, अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचा पहिला स्लॅब लवकरच होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नव्याने होणार्या हायटेक रत्नागिरी बसस्थानकाचा समावेश आहे. सुसज्ज, अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेले मध्यवर्ती बसस्थानकाचे गेल्या १० वर्षापासून रखडलेल्या कामाने आता खर्या अर्थाने गती घेत उभारी घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या बसस्थानकाच्या इमारतीचा पहिला स्लॅब चढणार असून काही महिन्यातच या बसस्थानकाचे काम मार्गी लावण्यासाठी वेगाने काम सुरू झाले आहे. www.konkantoday.com