रायगड मतदार संघातील प्रचारावर तटकरेंचा ५८, गीतेंचा ३० लाख रुपये खर्च
कोकणातील रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवलेल्या १३ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तिसरा व अंतिम आढावा खर्च निरीक्षक धीरेंद्रमनी त्रिपाठी यांनी घेतला. यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारासाठी सर्वाधिक ५८ लाखांचाा खर्च केल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण यांनी प्रचारासाठी खर्च केल्याचे समोर आले आहे.इंडिया महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी २७ लाख ६२ हजार २४७ रुपये खर्च दाखवला होता. शासकीय नोंदीनुसार ३० लाख ६४ हजार ९३४ रुपये झाल्याचे दिसले. त्यामुळे शासकीय नोंदीनुसार खर्चास मंजुरी देण्यात आली. तटकरे, गीते यांच्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी रविंद्र चव्हाण ८ लाख ५५ हजार ६२५ रुपये प्रचारावर खर्च केला आहे.www.konkantoday.com