राजापूर तालुक्यातील डिजिटल हेल्थकार्ड काढल्याने नागरिकांची आरोग्य कुंडली एका क्लिकवर
रूग्णांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा (आभा) भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थकार्ड हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून रूग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेेले उपचार आदी माहिती तत्काळ मिळणार आहे. आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे राजापूर तालुक्यातील ५५ हजार ५९० लोकांना आाभाकार्ड काढले आहे. त्यामुळे आता या लोकांची आरोग्य कुंडली एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.www.konkantoday.com