रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे कुंभारवाडी येथील चक्कर आल्याने तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे कुंभारवाडी येथे अचानक चक्कर आल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. सुरज सुरेंद्र साळवी (२७, रा. कोळंबे, कुंभारवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज हा १० मे २०२४ रोजी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ७ वाजता वॉशरूमला जावून आला. यावेळी त्याच्या छातीमध्ये दुखत असल्याने ही बाब त्याने आपल्या आत्याला सांगितली. यानंतर काही क्षणातच सुरजला चक्कर येवून तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रत्नागिरीतील खाजगी रूग्णालयात व नंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी सुरज याला तपासून मृत घोषित केले. www.konkantoday.com