
भाजपच्या – मांडीवर कडेवर बसून सत्तेची मौज लुटली… तेव्हा महाराष्ट्र द्रोही असल्याची लाज वाटली नाही-मनसे नेते गजानन काळे
राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी’, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.यानंतर मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष आणि नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.२०१४ पासून २०१९ पर्यंत मोदींच्या आणि भाजपच्या – मांडीवर कडेवर बसून सत्तेची मौज लुटली… तेव्हा महाराष्ट्र द्रोही असल्याची लाज वाटली नाही का ??? आता राजसाहेब ठाकरेंनी , मनसेने महायुतीला पाठींबा दिला तर मनोरुग्ण राऊतांचा तिळपापड झाल्याचं दिसतय…तुमचे उद्धव ठाकरे त्या ‘औरंग्याची औलाद’ अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ??? या महाराष्ट्र द्रोही अबू आझमी बरोबर युती केल्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील.???”, अशी पोस्ट काळेंनी केली आहे.www.konkantoday.com