
तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?-जितेंद्र आव्हाड
अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना ह्दयात जराही कालवाकालव झाली नाही? असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केला आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १९९१ साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवले. त्यानंतर सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवले, ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पक्ष ताब्यात घेतला असा आरोप त्यांनी केला.www.konkantoday.com