
गजाला मुकादम कोकण पदवीधर मतदार संघातून इच्छूक, अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन
गजाला मुकादम कोकण पदवीधर मतदार संघातून इच्छूक, अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन चिपळूण शहरालगतच्या कळंबस्ते येथील गजाला आदिल मुकादम यांनी कोकण पदवीधर मतदार संघासाठी इच्छूक असल्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी सभापती, पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांची गजाला मुकादम ही सून आहे. गजाला मुकादम यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले आहे. जिल्हयातील बचत गटाला मार्गदर्शन करणे व संजय गांधी निराधार, इंदिरा भूमी शेतमजूर, तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या रूग्णांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. www.konkantoday.com