
खेर्डी ग्रामपंचायतीने बांधलेल्या इज्जत घराची होतेय बेईज्जत
ग्रामस्थ व व्यापार्यांच्या सोयीसाठी चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायतीने रेल्वे पुलाजवळ बांधलेले स्वच्छतागृह (इज्जतघर) अडगळीत पडले आहे. त्यामुळे या इज्जतघराचीच बेईज्जत झाली असून पाण्यासह अन्य समस्यांनी डोके वर काढले आहे. तरीही त्याचा वापर सुरु असल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. तरीही त्याच्या स्वच्छतेकडे ग्र्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.खेर्डी गावाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. या गावातील वाड्यांची लोकसंख्या वाढत असून याच बाहेरील व्यक्तींचा अधिक समावेश आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. यातूनच ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली असून त्याला इज्जतघर असे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र याच इज्जतघराची सध्या बेइज्जत होताना दिसत आहे. www.konkantoday.com