खेड तालुक्यातील सवणस येथे एकावर सुर्याने वार, दोघांना अटक
खेड तालुक्यातील सवणस खुर्द मोहल्ला येथे एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. शाकिब अब्दुल सलाम सुर्वे (४०), तलत अब्दुल सलाम सुर्वे (४४, दोघे रा. सवणस खुर्द मोहल्ला) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या बाबात शेख दाऊद आदम सुर्वे (४५) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शाकिब सुर्वे व तलत सुर्वे हे फिर्यादीच्या घरासमोरील एसटी पिकअप शेडमध्ये गांजा पित असताना दोनवेळा समज दिली. याचा राग मनात धरून ते मशिदीसमोर एका मित्रासोबत बोलत असताना शिवीगाळ करत जवळ असलेल्या सुर्याने हातावर दोन वार करून जखमी केले. त्यानुसार दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. www.konkantoday.com