औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाला आहात? राऊतांचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचे उत्तर!!
* शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजली. पण सर्वांचे लक्ष होते ते औरंगजेबाच्या प्रश्नाकडे. कारण या मुलाखतीचा प्रोमो प्रकाशित झाला. तेव्हा त्यात राऊत यांनी ठाकरे यांना ‘औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात का?’ असा प्रश्न केला होता. या प्रश्नानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे त्याला ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आज प्रदर्शित झालेल्या मुलाखतीतून महाराष्ट्राला मिळाले संजय राऊत यांनी प्रश्न विचारताना तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सध्या आहात. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचाराने पुढे चालला आहात आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झाला आहात असा थेट प्रश्न विचारला. शिवाय हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब का आठवतोय? अशीही त्यांनी विचारणा केली. त्यावर लगेचच ठाकरें यांनी उत्तर देत सर्वच टिकाकारांची तोंड बंद केली.ठाकरे यांनी उत्तर देताना लगेचच सांगितलं, कारण त्यांना आवडता केक पाकिस्तानात जाऊन त्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी खाल्ला होता. त्याची आठवण त्यांना होते म्हणून ते असे प्रश्न उपस्थित करत असतात. बिनबुलाये मेहमान म्हणून पाकिस्तानात जाऊन शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारी लोकं मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत असे थेट उत्तर ठाकरे यांनी दिले. औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्माला आला होता. या पुढे बोलताना ठाकरे म्हणाले जसे हे दिल्लीत गेले, तसे औरंगजेब हा आग्य्रात होता. यावेळी त्यांनी मोदींचं नाव घेणं टाळलं. तरी इशारा हा मोदींनाच होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी जवळपास 27 वर्षे प्रयत्न करत होता. पुढे मिश्किल पणे बोलताना औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही असं म्हणत, महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच पुन्हा आग्य्राला जाऊ शकला नव्हता, हे लक्षात ठेवा असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.ठाकरे पुढे म्हणतात, त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचे जे शौर्य मराठ्यांनी गाजवले, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत हे लक्षात ठेवा. मोदी व शहा वारंवार महाराष्ट्रात येतात आणि उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिल्या क्रमांकाचं टार्गेट आहे असं संजय राऊत यांनी विचारलं. त्यानंतर त्यांचे टार्गेट हे शरद पवार आहेत. महाराष्ट्राची सूत्रं या दोन नेत्यांनी पुन्हा हाती घेतल्यामुळे मोदी-शहांना त्यांचं भय वाटतंय? असा प्रश्नही राऊत यांनी केला. त्याला उत्तर देतानाही ठाकरे यांनी जोरदार बॅटींग केली. असं म्हणतात की, मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे. तसं आम्ही दोघे त्यांच्या खेचरांना दिसत असू असे उत्तर उद्धव यांनी दिले.औरंगजेब हा विषय प्रचाराचा असू शकत नाही असेही ते म्हणाले. तुम्ही 10 वर्षे काय केलंत? पराभवाचे भूत समोर दिसायला लागल्यावर तुम्ही राम राम राम राम, करायला लागला आहात. निवडणुकीत तुम्ही राम… राम… राम… करायचं आणि निवडून आल्यावर लोक प्रश्न घेऊन आले की, मरा… मरा… मरा… मरा… असं करायचं असा टोला ठाकरेंनी मुलाखतीत लगावला. एका नेत्याला दोन वेळा म्हणजे सलग 10 वर्षे पंतप्रधान होण्याची संधी मिळते. पण 10 वर्षांनंतर जेव्हा तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातायत तेव्हा मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत असेही ठाकरे म्हणाले. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा यावर मोदी बोलतच नाहीत. असंही ते म्हणाले.www.konkantoday.com