ओणी-अणुस्कुरा मार्गावर रायपाटणदरम्यान साईडपट्टीचा भाग तुटल्याने वाहतुकीला धोका
ओणी अणुस्कुरा मार्गावर रायपाटण दरम्यान रस्त्यालगतच्या साईडपट्टीच्या बाजूचा भाग तुटल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करावी आणि तुटलेला भाग दुरूस्त करावा, अशी मागणी आता वाहन चालकांतून करण्यात आली आहे.रायपाटणमधील श्रीवडचीआई मंदिर ते टक्केवाडी दरम्यान असलेल्यया मोरी दरम्यान रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या दोन ठिकाणच्या साईडपट्टीच्या बाजूचा भाग खचला आहे. www.konkantoday.com