अखेर गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर बोगस निविदा प्रकरणी अखेर १५ रोजी चौकशी
गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईने २९ फेब्रुवारी रोजी छापून आणलेल्या कामांची बोगस निविदेच्या तक्रारीनंतर तब्बल २ महिन्यांने पंचायत समिती विस्तार अधिकारी यांना चौकशीचा मुहूर्त सापडला असून १५ मे रोजी वेळणेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी लावण्यात आली आहे.वेळणेश्वर ग्रामपंचायतीमधील बोगस निविदा प्रकरण गाजले आहे. तब्बल ९ ते १० कामाची निविदा २९ फेब्रुवारी रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातील वृत्तपत्रात निविदा होती, परंतु बाहेर विक्रीला असणार्या प्रतींमध्ये निविदास दिसून येत नाही. या प्रकरणी येथील सुरेंद्र घाग यांनी ११ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची दखल गटविकास अधिकारी यांनी घेत येथील विस्तार अधिकारी बी. जे. देवकाते यांना चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान गेले २ महिने या प्रकरणी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. मात्र आता १५ मे रोजी सकाळी ११.३० वा. वेळणेश्वर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, ग्रामविकास व तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावले असून तसे पत्र विस्तार अधिकारी बी. जी. देवकाते यांनी काढले आहे.www.konkantoday.com