साठरे बांबरच्या पॅराप्लेजिक कु.सुनिल चंद्रकांत यादव याला आर एच पी फाउंडेशनचा मदतीचा हात
रत्नागिरी..कु.सुनिल चंद्रकांत यादव. वय २८ वर्ष.मु.पो.साठरे बांबर ता. जि.रत्नागीरी याला आर ऐच पी फाउंडेशनतर्फे नवीन व्हीलचेअर देण्यात आली.व्हीलचेअर दिल्याबद्दल सुनिलच्या वडीलांनी व कुटुंबियांनी आरएचपी फाउंडेशनचे विशेष आभार मानले.सुनिल यादव १०वी पर्यत शिक्षण झाल्यानंतर मोलमजुरी करत होता.२१ वर्षाचा असताना झाडावरुन खाली पडला आणी पाठीच्या मणक्याला मार लागला.त्याला लगेच रत्नागीरी सिव्हिल हॉस्पीटलला दाखविले त्यांनी तपासुन सीपीआर हॉस्पीटल कोल्हापुरला घेवुन जाणेस सांगीतले.सीपीआरमधुन त्याला केईएम हॉस्पीटल मुंबईला पाठविले.तिथे त्याच्या मणक्यावर ऑपरेशन झाले पण त्यानंतर कमरेपासुन खालील भागाच्या संवेदना गेल्या.युरीन मोशन कंट्रोल जावुन तो पॅराप्लेजिक झाला.सातवर्षापासुन तो जागेवरच आहे.चालता येत नाही.केईएम हॉस्पीटलमधुन एक व्हीलचेअर मिळाली होती ती वापरत होता.आई सौ चंद्रकळा चंद्रकांत यादव यांच्या मदतीने घरीच तो सर्व करत होता.दोनवर्षापुर्वी आईचेही अल्पशा आजाराने निधन झाले.आता सर्व जबाबदारी वडीलांवरच आली आहे.वडील श्री चंद्रकांत दत्ताराम यादव हे गवंड्याच्या हाताखाली काम करतात.सकाळी लवकर उठुन सुनिलचे आवरतात.जेवण बनवुन त्याचे ताट वाढुन ठेवतात व कामाला जातात.गावी वडील आणि सुनिल दोघेच असतात.त्याची सध्याची व्हीलचेअर खराब झाली होती.हॅण्डीकॅप सर्टिफिकेट काढताना समीर नाकाडेंशी ओळख झाली.त्यानंतर आर एच पी फाउंडेशनची माहीती मिळाली.संस्थेमधे नाव नोंदणी केली तेव्हा नवीन व्हिलचेअरची मागणी केली होती.आर एच पी फाउंडेशनचे आध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडे यांनी सुनिलची सर्व माहीती घेतली आणी व्हीलचेअरसाठी डोनर मिळवुन व्हिलचेअर देणेची ग्वाही दिली.त्याप्रमाणे सादीक नाकाडेंचे मित्र श्री जयंत चुणेकर यांनी डोनेशनमधे व्हीलचेअर द्यायचे कबुल केले.त्यांच्या अनुभुती या जोतिष शास्रीय मार्गदर्शन आणी समुपदेशन कार्याला ६ वर्ष पुर्ण झाली.त्यातुन होणारे अर्थार्जन हे समाजकार्यासाठी वापरतात.त्यानिमित्ताने गरजु व्यक्तीला मदत म्हणुन सुनिल यादव याला सोयीस्कर अशी फोल्डेबल अशी व्हीलचेअर दिली. व्हीलचेअर घेणेसाठी स्वत: सुनिल चंद्रकांत यादव,त्याचे भावोजी श्री.सुरज युवराज जाधव,मामा श्री.मंगेश रामचंद्र यादव.वडील श्री.चंद्रकांत दत्तात्रय यादव उपस्थित होते.तसेच आरएचपी फाउंडेशनचे आध्यक्ष श्री सादीक नाकाडे सदस्य श्री समीर नाकाडे,प्रिया बेर्डे,डॉ मुस्कान नाकाडे उपस्थीत होते.अशाप्रकारचे अनेक गरजु दिव्यांग आहेत.त्यांच्यासाठी सोयीस्कर व्हीलचेअरची गरज आहे.तरी कोणास अशी मदत करावयाची असल्यास नाकाडेसरांशी(8329534979) या नंबरवर संपर्क साधावा.www.konkantoday.com