शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकर यांना नोटीस
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायकर यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून नोटीस पाठवण्यात आली आहे.त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.शिवसेना फुटीनंतरही रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले होते. पण, नंतर महिन्याभरापूर्वी वायकर ईडीच्या भीतीने शिंदे गटात गेले. शिंदे गटाकडून त्यांना वायव्य मुंबईत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. दोन दिवसाने विधानसभा अध्यक्षांना देखील नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.www.konkantoday.com