लिओ क्लब रत्नागिरी २चा पदग्रहण सोहळा
विद्यार्थीदशेमध्येच त्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजसेवेची आवड निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार लिओ क्लब रत्नागिरी २चा पदग्रहण सोहळा सोलापूर येथे झाला. यामध्ये लिओ सिद्धी केळकर यांची संस्थापक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे लिओ क्लबची स्थापना करण्यात आली. त्यासाठी दत्तप्रसाद कुळकर्णी, पराग पानवलकर, श्रद्धा कुळकर्णी, ओंकार फडके, झोन चेअरपर्सन श्रेया केळकर व अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी मेहनत घेतली. स्थापनेच्या प्रक्रियेत सोलापूर येथील लिओ डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन अतुल सोनिग्रा व लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पवन यांचे विशेष सहकार्य लाभले.www.konkantoday.com