रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा खानवली येथे जाणाऱ्या कारला पोलादपूर येथे भीषण अपघात, दोन ठार, तीन गंभीर जखमी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव कार उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. पोलादपूर येथील आंबेडकर नगर समोर उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक ऐन एल ०१ ए ई ३१५० ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या, एम एच ०३ सी एस ११७७ या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई दिशेकडून होंडा कंपनीची कार रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली बने कडे सुट्टीसाठी जात होती. या मार्गावर त्यावेळी कार भरधाव वेगात होती. भरधाव कार असलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार अर्ध्यापर्यंत कंटेनरच्या खाली घुसली. या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच मृत्य झाला.अनिल भीमा शिंदे वय ४० राहणार पुणे या कार चालकाचा मृत्यू झाला. तर सुमती यशवंत शिंदे वय ७५ यांचाही अपघातात या जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू झाला असून निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा, जानवी निलेश दळवी वय ४५, यश निलेश दळवी वय १८ सर्व राहणार खाणवली लांजा, असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या कारमध्ये ५ प्रवासी प्रवास करत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.www.konkantoday.com