यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला पण पीक साधारण,देशाचा राजा कायम राहील.
यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील, अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान पीक-पाणी, राजकारण याचा वेध घेण्यासाठी बुलढाणा आणि आजुबाजूच्या गावातील मंडळींनी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला तोबा गर्दी केली होती.भेंडवळ भविष्यवाणी नुसार 2024-25 जून महिन्यात पाऊस कमी पडेल. त्यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात होईल. तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस असेल. असे भेंडवळच्या मध्यमातून समोर आले आहे. भेंडवळचे हे भाकीत असले तरी यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.देशात राजाची सत्ता कायम राहिल असे भाकीत करण्यात आले आहे. आर्थिक संकट दुर होईल. संरक्षण खात्यावर ताण, घुसखोरीची शक्यता आहे, असे भेंडवळने आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी भेंडवळ येथे घट मांडणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार यंदाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्यभरातील बळीराजा या भेंडवळीचं भविष्य जाणून घेऊन आगामी पेरणी करतो.www.konkantoday.com